अकोला: जिल्ह्यात अवैध गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम, ७६ गुन्हे दाखल, ७.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Akola, Akola | Nov 12, 2025 अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात अकोला जिल्हा पोलिस दलाने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. १० व ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील विविध ठिकाणी ७६ गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण ७५ ठिकाणी छापे टाकून ७ लाख ५२ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त व सुमारे ७.३६ लाख रुपयांचा अवैध साठा नष्ट करण्यात आला. अवैध दारूविरोधातील ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.ही माहिती जिल्हा पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी तथा पोलीस निरीक्षक