धर्माबाद: तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी ध्वजारोहण पार पडल्यावर काळी फीत बांधून केले राज्य सरकारचा निषेध
दि. 8 सप्टेंबर रोजी पासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कारेगाव फाटा येथे साखळी उपोषण सुरू आहे परंतु अद्यापही राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नसल्याकारणाने धर्माबाद तालुका संघर्ष समितीच्या वतीने दि 17 सप्टेंबर रोजी काळी बांधून राज्य सरकारचा निषेध करण्याचे ठरले होते त्यानुसार आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ध्वजारोहण पार पडल्यावर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी काळी फिती बांधून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राज्य सरकारचा निषेध केले आहेत.