जालना: जलसंवर्धन ही काळाची गरज; युवकांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांचे प्रतिपादन
Jalna, Jalna | Jun 5, 2026 बदलत्या हवामान परिस्थितीत जलसंवर्धन आणि जलसाक्षरता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनली आहे. युवकांनी पाणी बचत, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन आणि जलव्यवस्थापनाबाबत समाजामध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. वाढते जलसंकट, भूजल पातळीतील घट आणि हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेता युवकांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. शुक्रवार दि. 5 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम पार पडला.