विरार येथील शिरगाव येथे गुजरात मधील द्वारकाधीश मंदिराची प्रतिकृती असलेले भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठापना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते संपन्न झाले श्रीकृष्णाला समर्पित द्वारकाधीश मंदिराची ही प्रतिकृती असून कोणत्याही लोखंडी सळी, साच्याचा वापर न करता, बन्सी पहाडपुर दगड वापरून 90 फूट उंचीचे हे मंदिर इंटरलॉक पद्धतीने नागरशैलीत बांधण्यात आले आहे. याप्रसंगी मान्यवर, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.