औसा: आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत श्री वेताळेश्वर संस्थासंचालित एसव्हीएसएस फिजिओथेरपी महाविद्यालयात पदवीदान उत्साहा
Ausa, Latur | Oct 8, 2025 औसा – महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा पदवीदान सोहळा औसा येथे आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे उपायुक्त सामाजिक न्याय विभाग, लातूर अविनाश देवशटवार आणि जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी संतोष हिंदोळे यांच्या हस्ते ३० पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शपथ प्रदान करून गौरविण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजने केली.