जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या 'लेवा भवन' च्या वापरावर ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी गंभीर आरोप केले आहे. माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी समाजाच्या नावाखाली लेवा भवनाचा कर्मशिअल वापर करून कोट्यावधी रूपये कमावले आहे, असा आरोप पियुष पाटील यांनी गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता दीक्षितवाडी येथे पत्रकार परिषदेत केले आहे.