पुणे शहर: स्वारगेट बसस्थानकाबाहेर मोबाईल हिसकावून जबरी चोरी.
Pune City, Pune | Oct 19, 2025 स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८९/२०२५ अंतर्गत भा.दं.सं. कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर येथील ३९ वर्षीय इसमाकडून दोन अनोळखी इसमांनी स्वारगेट बसस्थानकाबाहेर ४० हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून नेला. फिर्यादी अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरले असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दोन्ही इसम अद्याप फरार असून स्वारगेट पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे