गंगापूर: गंगापूर लासुर रोडवरील गुरुमाऊली हॉस्पिटलजवळ अपघात
आज सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की येथील गंगापूर-लासुर रोडवरील गुरुमाऊली हॉस्पिटलसमोर अपघात झाला झालेल्या अपघाताची माहिती मिळताच, रुग्णवाहिका चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी रुग्णाला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात (घाटी) दाखल करून माणुसकीचे दर्शन घडवले.मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच, रुग्णवाहिका चालक नंदू सातपुते, तसेच सागर खर्डे, राहुल राजपूत आणि अमोल बोरुडे यांनी तात्काळ धाव घेतली.