शिरूर कासार: मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप झाल्याने समर्थकांनी शिरूर कासार पोलीस ठाण्यास निवेदन दिले
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात येत असल्याचा गंभीर आरोप झाल्याने सकल मराठा समाज, शिरूर (का.) यांच्या वतीने पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, "मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अखंड लढा देत आहेत. मात्र काही विरोधकांकडून त्यांच्या जीवावर उठण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने अशा व्यक्तींविरोधात कारवाई करून जरांगे पाटील यांना योग्य संरक्षण द्यावे," अशी मागणी करण्यात आली आहे.