अमरावती: अमरावतीच्या सायन्सकोर मैदानात फटाका विक्रीसाठी ग्राहकांची गर्दी, लक्ष्मी मूर्ती, दिव्यांचे वेगवेगळे प्रकार विक्रीला
शहरातील मध्यभागी असलेल्या सायन्स स्कोर मैदानात फटाक्यांच्या विक्रीसाठी नागरिकांची आज चांगलीच गर्दी जमली होती. त्याचबरोबर लक्ष्मीच्या मूर्ती आणि वेगवेगळ्या प्रकारची दिवे ही बाजारात पाहायला मिळाले. दिवाळी च्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग आणि सोबत परिवारासह प्रत्येक जण बाजारात खरेदीसाठी येत असल्याने इतर सणाच्या तुलनेत गर्दीचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. फटाका विक्रीसाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासनातर्फे शहराच्या मध्यभागी असलेले सायन्सकोर मैदान निवडण्यात आले आहे.