नगर: झेंडिगेट येथील कत्तलखान्यावर महापालिकेची कारवाई
अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात काल गोमांस आढळून आले. यावर आमदार संग्राम जगताप व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले होते. गोमांस टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले. तो झेंटीगेट परिसरातील व्यापारी मोहल्ला येथील रहिवासी असल्याने आज महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक व महापालिका अधिकारी झेंडी गेटच्या व्यापारी मोहल्ल्यातील कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेले होते.