पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीतील लक्ष्मण रेखा अपार्टमेंट येथे शोभना रॉय आदित्य यांच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीला अंबाझरी पोलिसांनी तपासा दरम्यान अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव वैभव वांद्रे व रोहित बानमारे असे सांगण्यात आले आहे. आरोपींनी अंबाझरी हद्दीतून दोन वाहन चोरी केल्याची देखील कबुली दिली आहे .