जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याबाबत रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.