सातारा: व्हाट्सअपवर दुकानाची जाहिरात करण्यासाठी दिलेली ऑफर मुळे गुरुवार पेठेतील दुकाना बाहेर महिलांचा गोंधळ
Satara, Satara | Sep 22, 2025 साताऱ्यातील गुरुवार पेठ येथील नव्याने सुरू झालेल्या एका फार्मिंग दागीण्याच्या दुकानदाराने, दुकानाची जाहिरात करण्यासाठी महिलांना व्हाट्सअप स्टेटसवर दुकानाची जाहिरात ठेवून, प्रथम हजार महिलांसाठी गिफ्ट ठेवले, याद्वारे सातारा जिल्ह्यासह, परजिल्ह्यातील महिलांनी सदर जाहिरात व्हाट्सअप स्टेटस वर ठेवून, आज सोमवारी सकाळी दुकानात गिफ्ट घेण्यासाठी हजारो महिला आल्या होत्या, मात्र गिफ्ट मिळेल की नाही या कारणावरून महिलांनी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारपर्यंत दुकानासमोर एकच गोंधळ केला.