जालना: दामीनी पथक झाले सक्रीय; महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरू, टवाळखोरांवर कारवाई
Jalna, Jalna | Jun 14, 2026 महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देत जालना जिल्हा पोलीस दलाने दामीनी पथक सक्रीय केले असून मदतीसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे. रविवार दि. 14 जून 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणी पथकाने भेटी देत जनजागृती केली तसेच महिला व मुलींना त्रास देणार्या टवाळखोरांवर कारवाई केली. पोलीस प्रशासनाकडून महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र दामीनी पथक कार्यरत करण्यात आले आहे.सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्यांना प्रतिबंध बसणार आहे.