याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, वडगाव शिंदे येथील हॉटेल व्यावसायिकाने २०२३ रोजी एका फायनान्स कंपनीकडून ९ लाख ८० हजारांचे लोन काढले होते. नियमित हप्ते भरून लोन क्लिअर करण्यासाठी २०२५ मध्ये कंपनीचा नंबर गुगलवर सर्च केला असता एक मोबाईल नंबर मिळाला. त्यावर संपर्क साधला असता सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाच्या मेलवर अकौंट डीटेल्स पाठविल्या. व्यावसायिकाने ५ लाख ६१ हजारांची संपूर्ण रक्कम ट्रान्सफर करून फोर क्लोजर लेटर मागितले. लेटरसाठी त्यानंतर टाळाटाळ करण्यात आली.