स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने मिळालेल्या गोपनिय माहिती चे आधारे पो. स्टे. बल्लारपूर हद्दीत सापळा रचुन आरोपी सलमान उर्फ राज सलीम खान (३२) रा. भगतसिंग वार्ड बल्लारपूर यास काल दि ७ डिसेंबर ला रात्री ८ वाजता ताब्यात घेवुन त्याचेकडुन अवैध रित्या बाळगुन असलेला एक देशी बनावटीची लोखंडी (अग्नीशस्त्र) देशी कट्टा किं.अं.८०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.