टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील सिल्वर व ब्रांझ मेडल मिळवणाऱ्या ग्रामपंचायतींचा पंचायत समिती कुडाळ येथे सत्कार
241 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 8, 2025 आज दिनांक 08/08/2025 रोजी पंचायत समिती कुडाळ येथे *टीबी मुक्त ग्रामपंचायत* *पुरस्कार* वितरण करण्यात आले. तेरा ग्रामपंचायतींना *ब्राँझ* तर चार ग्रामपंचायतींना *सिल्वर* मेडल देण्यात आले या कार्यक्रमाला मा श्री जयप्रकाश परब *उपमुख्य* *कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग*, मा श्री वीरसिंह वसावे *तहसीलदार* कुडाळ, मा श्री प्रफुल्ल वालावलकर *गटविकास अधिकारी* कुडाळ ,मा श्रीमती वर्षा शिरोडकर *_तालुका आरोग्य अधिकारी* कुडाळ तसेच मा श्री राठोड *अभियान व्यवस्थापक* कुडाळ ,मा श्री संजय आरोसकर,मा श्री धरणे, मा श्री गवस *विस्तार अधिकारी* सर्व ग्रामपंचायत *सरपंच* तसेच *ग्रामसेवक*, *आरोग्य कर्मचारी* ,*आशा* स्वयंसेविका उपस्थित होत्या.