नागपुरात शेअर मार्केट व्यावसायिक विद्याभारती पटेल यांची ६० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांनी मौजा गोधनी येथील आठ प्लॅट्ससाठी आरोपी नबाब मोहसीन खान आणि अल्ताफ अक्रम खान यांना पैसे दिले होते. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी प्लॅट्सचे विक्रीपत्र करून न देता त्यांचा विश्वासघात केला.