भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बीड विमानतळ जागेची जाऊन पाहणी केली
बीड शहराजवळील कामखेडा येथे प्रस्तावित विमानतळासाठी कामखेडा गावात जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आज एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी बीड शहराजवळील कामखेडा येथील प्रस्तावित विमानतळ परिसरास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. या पाहणी दरम्यान प्रस्तावित जागेचे सर्व तांत्रिक व प्रशासकीय पैलू तपासण्यात आले. विमानतळ प्रकल्पासाठी बीडजवळील कामखेडा परिसर अधिक सोयीचा ठरेल, असा निष्कर्ष प्राथमिक चर्चेतून पुढे आला आहे.