पोलिओ प्रतिबंध आणि पोलिओचे उच्चाटन करण्याचा निश्चय करुन त्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी 24 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभरात ‘जागतिक पोलिओ दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘पोलिओमुक्त जग’ हे उद्दि ष्ट साध्य करण्यासाठी त्याबाबत सुरु असलेल्या कामांना प्रोत्साहित करीत लसीकरण मोहिमांचे महत्व या दिवशी अधोरेखीत केले जाते. या वर्षीची पोलिओ दिनाची संकल्पना ‘पोलिओ समाप्त करा : प्रत्येक बालक, प्रत्येक लस, प्रत्येक ठिकाणी ही असून त्यादृष्टीने जागरुकता निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई जॉय ऑफ गिव्हिंग आणि आरसीसी नवी मुंबई शेपर्स यांचे सहकार्य लाभले.