ठाणे: अखेर मुंब्रा बायपासवर लागला स्पीडब्रेकर
Thane, Thane | Oct 21, 2025 मुंब्रा बायपासवर अनेकदा अपघात होत असतात. अनेकदा स्थानिकांनी या ठिकाणी स्पीडब्रेकर लावण्याची मागणी केली होती. तसेच मुंब्रा येथील आर्शिया फाउंडेशनच्या अध्यक्षा रीदा रशीद यांनी देखील या ठिकाणी स्पीडब्रेकर लावण्याची मागणी केली होती. अखेर आता या ठिकाणी स्पीडब्रेकर लावण्यात आला असून रीदा रशीद यांनी आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.