चंद्रपूर: जिल्ह्यातील चिंधीचक गावाच्या मध्यवस्तीत बिबट्याची एन्ट्री; तिन शेळ्यांचा फडशा
जिल्ह्यातील चिंधीचक गावात काल दि 20 सप्टेंबर 11 वाजता मध्यरात्री बिबट्याने थेट मध्यवस्तीत शिरून तिन शेळ्यांचा फडशा पाडला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा थरार स्पष्टपणे कैद झाला आहे. अचानक गावाच्या हृदयस्थानीच वन्यप्राण्याने शिकार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात माणसांवर हल्ल्याचा धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.