धर्माबाद: शहरातील मुख्य बाजार पेठेत तीनचाकी सह मोठ्या वाहनांना तीन दिवस प्रवेश करण्यास मज्जाव
दिवाळी सणाच्या अनुषंगाने धर्माबाद बाजार पेठेत होणारी नागरिकांची वर्दळ लक्षात घेता मा. पोनि भडीकर यांच्या सूचनेनुसार शहरातील नगर पालिका चौक नरेंद्र चौक नेहरू चौक व मोंढा जाणारा रस्ता हा तीनचाकीसह मोठ्या वाहनांना आता सलग तीन दिवस प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असून ठिकठिकाणी बॅरिकेटस देखील लावण्यात आले आहेत. कापड रेडिमेड कपडे दिवाळीचे साहित्य पूजेचे सामान आदि खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याने ही उपाययोजना धर्माबाद पोलिसांनी केले असून पोलिसांनाकडून पायी पेट्रोलिंग देखीलसुरू