दर्यापूर: मुऱ्हा बु येथील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी;पोलिसांचा कडक बंदोबस्त
संपूर्ण भारतभर नवरात्री उत्सव साजरा होत असताना,दर्यापूर मार्गावरील मुऱ्हा गावातील प्राचीन जगदंबा मातेच्या दर्शनासाठी आज सकाळी ७ वाजतापासून भाविकांनी मोठी गर्दी केली.देवीच्या दर्शनासाठी भाविक आपल्या मनोकामना घेऊन मंदिरात आले.मंदिरासंबंधित ऐतिहासिक कथा अशी आहे की,प्राचीन काळात मुऱ्हा येथे एका राक्षसाचे तांडव सुरू होते,ते राक्षस येथील नागरिकांवर अत्याचार करायचे.जगदंबा मातेने त्या राक्षसाचा वध करुन त्याला एका गुहेत बंद केले होते त्यामुळे येथील परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.