पनवेल महानगरपालिकेच्या वतीने “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत विकासासाठी विद्यार्थ्यांना व युवकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने पर्यावरण दूतांची निवड करण्यासाठी कोपरा, मुर्बी, खारघर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये नुकताच विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. कोपरा, मुर्बी, खारघर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादामध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदल साक्षरता आणि स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.