ठाणे: मध्यरात्री ईमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग मध्ये लागली भीषण आग, गाड्या जळून खाक
Thane, Thane | Nov 29, 2025 गायमुख परिसरातील भाईंदर पाडा येथे सोसायटीतील इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पार्किंग मध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर अग्निशमन तर घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र लागलेल्या आगीमध्ये तीन दुचाकी गाड्या जळून खाक झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु अचानक इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्यामुळे इमारतीत धूर आणि आग पसरली होती, त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.