पोलादपूर: रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत बैठक
आज मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास मंत्रालयात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील केवनाळे (ता. पोलादपूर) गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत बैठक पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून केवनाळे गावातील नागरिकांच्या मागण्या, त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा तसेच पुनर्वसन आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रायगड-अलिबागचे जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.