जालना: जालना तापमान ४०°c पार; पाणपोळ्या नामशेष होण्याच्या मार्गावर, ‘जार संस्कृती’चा वाढता प्रभाव!..
Jalna, Jalna | Apr 25, 2026 जालना तापमान ४०°c पार; पाणपोळ्या नामशेष होण्याच्या मार्गावर, ‘जार संस्कृती’चा वाढता प्रभाव!.. आज दिनांक 25 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून आज तापमान थेट ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पूर्वी सर्वत्र दिसणाऱ्या पाणपोळ्या आता हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील गणपती गल्ली परि