तिरोडा: नवेझरी परिसरात वाघाची दहशत; शेळीची केली शिकार; काही दिवसांपूर्वी गाईला केले होते ठार
Tirora, Gondia | Sep 16, 2025 तिरोडा तालुक्यातील नवेझरी परिसरात वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण दिसून येत आहे. वाघाने काही दिवसांपूर्वीच कुलपा गावातील दीपक मरकाम या शेतकऱ्याच्या गायीला शिकार बनवले होते व वाघाने दिनांक 15 सप्टेंबरला दुपारी सुरुवातीला तुलाराम कापगते यांच्या शेळीची शिकार केली. व त्या नंतर दिनांक 15 सप्टेंबरलाच नवेझरी गावाच्या जवळ काही नागरिकांना झुडपात वाघाचे दर्शन झाले.