पनवेल तालुक्यातील सांगडे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १ कोटी रुपयांचची विकासाची कामे मंजूर झाली आहे. या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेट भगत यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन आणि एमएमआरडीएच्या निधी मधून ही विकासकामे मार्गी लागली आहेत. या विकासकामांच्या माध्यमातून सांगडे गावाचा चेहरामोहरा बदलणार असून ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.