खामगाव: ड्रेनेजसाठी खोदलेल्या नालीत कार पलटी झाल्याची घटना खामगाव शहरातील बोबडे कॉलनी येथे घडली
ड्रेनेजसाठी खोदलेल्या नालीत कार पलटी झाल्याची घटना खामगाव शहरातील बोबडे कॉलनी येथे २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. या अपघातात खामगाव शहरातील प्रतिष्ठित डॉ. ब्रह्मानंद टाले हे थोडक्यात बचावले आहे. खामगाव शहरात ड्रेनेज चे काम कंत्राटदाराच्या कडून सुरू असून ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहे या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत असून वाहनधारक जखमी होत आहे. अशाच प्रकारे खामगाव शहरातील बोबडे कॉलनी भागात एका ड्रेनेसच्या खड्ड्यामध्ये कार पलटी झाली.