जामखेड: जामखेड हादरलं! बाप-लेकाने गळफास घेऊन संपवले जीवन; एकाच झाडाला, एकाच कापडाने घेतला गळफास, नेमकं काय घडलं..!
जामखेड शहरात वडील आणि मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील नवीन कोर्टरोड व म्हाडा कॉलनीच्या बाजूला असलेल्या एका शेतात वडील व मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे ज्या मॅटच्या कापडाने मुलाने गळफास घेतला, त्याच मॅटच्या कपड्याने वडीलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.