दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर, पोमेंडी बुद्रुक (प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई), तालुका- जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने सेंट थॉमस शाळा येथे ९ ते १४ वयोगटातील १०५ मुलींना एचपीव्ही (HPV) लस देण्यात आली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरणाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई च्या वैद्यकीय अधिकारी डॉ शीतल सूर्यवंशी,समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) श्रीम. अंभोरे,आरोग्य सेविका श्रीमती रसाळ, पालशेतकर, स्वाती शिंदे, अनुश्री शिंदे,श्रीमती फुकट तसेच आरोग्यसेवक चव्हाण, गट प्रवर्तक श्रीमती इंदुलकर,आशा सेविका श्रीमती पांचाळ, लांजेकर, कुळीये,मोरे, तेरवणकर उपस्थित होत्या.