समुद्रपूर: भवानपुर येथे भरदुपारी गावाशेजारील पाण्याच्या टाकीजवळ गोऱ्यावर वाघाचा हल्ला:गोरा जागीच ठार
गिरड,खुर्सापार परीसरात वास्तव्यास असलेल्या एक वाघ एक वाघीण व तिचे तिन पिल्ले एकामागून एक पाळीव जनावरांची शिकार करीत असल्याने शेतकरी,शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भवानपुर येथे भरदुपारी गावाशेजारील असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ,चरत असलेल्या अनिल शंकर वाकडे यांच्या गोऱ्यावर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची माहिती १४ डिसेंबरला वन विभागाकडून प्राप्त झाली आहे.घटनेची माहिती मिळताच वनपरीश्रेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या सूचनेवरून पि.डी.बेले यांनी पंचनामा केला आहे.