समुद्रपूर: वाघाच्या हल्ला तिन गाय एक गोरा ठार:खैरगाव येथील गावाशेजारील घटना:शेतकऱ्याचे लाखाच्यावर नुकसान
समुद्रपूर :तालुक्यातील गिरड,खुर्सापार परीसरात असलेल्या एक वाघ एक वाघीण व तिच्या तिन पिल्ले हे वाघाच्या कुटुंब पाळीव जनावरांच्या शिकारीच्या मागे लागले असुन रोज एकामागून एक शिकार करीत असल्याने शेतकरी,शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खैरगाव येथे गावाशेजारील असलेल्या शेतात बांधून असलेल्या यज्ञपाल विजयसिंग छौयले यांच्या तिन गायी व एका गोऱ्यावर हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे.