भंडारा नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभेचे आयोजन भंडारा शहरातील किसान चौक येथे दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान करण्यात आले होते. या जाहीर सभेत अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या जाहीर सभेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह माजी खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, भाजप जिल्हाध्यक्ष