भोकरदन: गोद्री येथून मंगरूळ मांगीर बाबा देवस्थान येथे जाणाऱ्या पवित्र कावीड यात्रेचे दानापूर येथे आ.संतोष दानवेनी घेतले दर्शन
आज दिनांक 12 ऑक्टोबर २०२५ वार रविवार रोजी दुपारी दोन वाजता भोकरदन तालुक्यातील गोद्री येथून मंगरूळ मांगिरबाबा देवस्थान येथे जाणाऱ्या पवित्र कावीड यात्रेचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी दानापूर येथे मनोभावे पूजन करत दर्शन घेतले आहे, व मतदारसंघातील व देशातील व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे आरोग्य सुखी समाधानी राहवा अशी प्रार्थना केली आहे याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व भावीभक्त उपस्थित झाले होते.