नागपूर शहर: सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींना अटक : श्वेता खाडे सहाय्यक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांनी 27 सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्राचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्वेता खाडे यांनी दिली आहे.