नागपूर ग्रामीण: लावा परिसरात खळबळ; रक्ताच्या थारोळ्यात आढळला नग्नावस्थेतील मृतदेह, दगडाने ठेचून खुनाचा संशय
नागपूर जवळील लावा परिसरात आज एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मृतदेह नग्नावस्थेत असून त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा निर्घृण खून असल्याचे बोलले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लावा परिसरातील एका निर्जन ठिकाणी असलेल्या एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.