जळगाव तालुक्यातील वावडदे गावातील मातोश्री नास्ता सेंटरजवळ वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरूणाला चार जणांनी धारदार वस्तू आणि लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.