जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात बसमध्ये चढत असलेल्या एका प्रवाशाच्या खिशातून तीन अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तपास करून तीन चोरट्यांना शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे.