पनवेल: पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५ साठी आरक्षण जाहीर
Panvel, Raigad | Nov 11, 2025 पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मंगळवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आरक्षण निश्चितीसाठी सोडतीचे आयोजन करण्यात आले. या सोडतीमध्ये महानगरपालिकेतील वीस प्रभागांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला या प्रवर्गांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या आरक्षण सोडतीमध्ये एकूण २५ जागांवर सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे.