तेल्हारा: “प्रवक्तेपद नाही, अजितदादांचा कार्यकर्ता असणं माझ्यासाठी मोठं!” अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया.
Telhara, Akola | Nov 11, 2025 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले, “हकालपट्टी किंवा उचल बांगडी हे शब्दप्रयोग चुकीचे आहेत, कारण पक्षाकडून कोणतेही अधिकृत पत्र आलेले नाही. मी अजूनही अजितदादा पवार यांचा कार्यकर्ता आहे आणि हेच माझ्यासाठी प्रवक्तेपदापेक्षा मोठं पद आहे.” त्यांनी पुढे म्हटलं, “मला प्रवक्तेपद गमावल्याचं दुःख नाही. भारतीय संविधानाने मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्याचा मी पूर्ण वापर करणार.”