वर्धा: पिंपळ गाव लूटे येथे ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामूळे इसमाचा मृत्यू : देवळी पोलिसात गुन्हा दाखल
Wardha, Wardha | Nov 10, 2025 देवळी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास रमेश पाटील राहणार पिंपळगाव लुटे यांनी शेतात रोटावेटर मारण्यासाठी ट्रॅक्टर चालकासह ट्रॅक्टर शेतात नेला होता,रात्री शेतातून परत येत असतांना ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर निष्काळजीपणे व हयगईने चालवल्यामुळे रमेश पाटील यांच्या अपघात हुन मृत्यू झाला अशी तक्रार फिर्यादी यांनी देवळी पोलिसात दिली आहे,पोलिसांनी ट्रॅक्टर चालंकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.