म्हसळा: म्हसळा तालुक्यात वृद्ध दाम्पत्याचा खून
स्थानिक गुन्हे शाखा : डॉग स्कॉड,फॉरेनसिक व फिंगर प्रिंट तज्ज्ञ घटना स्थळी दाखल
Mhasla, Raigad | Nov 2, 2025 म्हसळा तालुक्यातील मेंडदी येथे एक वृद्ध दाम्पत्य संशयस्पद कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. महादेव बाळ्या कांबळे वय 95 वर्षे तर त्यांच्या पत्नी विठाबाई महादेव कांबळे वय 83 वर्षे हे वृद्ध दाम्पत्य हे म्हसळा तालुक्यातील मेंडदी कोंड येथे राहत होते. मात्र शनिवारी रात्री त्यांच्या घरातून कुजल्याच वास येत असल्याने गावातील काही नागरिकांनी त्यांचा घर उघडल्यावर त्यांना धक्का बसला. महादेव कांबळे व त्यांचा पत्नी या घरातील पलंगावर मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या.