नांदेड: कोणाळे कोचिंग क्लासेस वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेचे अधिकारी कारवाई न करताच परतले
Nanded, Nanded | Nov 4, 2025 आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान स्टेडियम जवळ कोणाळे कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेचे अधिकारी कारवाई न करता मुदत देऊन परतले. स्टेडियम जवळ कोणाळे कोचिंग क्लासेसची टोलेजंग इमारत आहे. अनाधिकृत रित्या इमारत उभारल्याची तक्रार काही जणांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार अज महापालिकेचे अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले होते. पण संचालकाने वरच्या मजल्यावरील अतिक्रमन काढण्यासाठी आठ दिवसाची मुदत मागितल्याने अधिकारी कारवाई न करता परतले.