अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांनी आज दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास अधिकृतपणे नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. गेल्या ३५ वर्षांपासून असलेल्या शिवसेनेच्या वर्चस्वाला सुरुंग लावत भाजपने पहिल्यांदाच अंबरनाथ नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे. आज सकाळी अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात एका विशेष समारंभात तेजश्री करंजुले यांनी पदभार स्वीकारला.