गणेश नाईक हे कसलेले पैलवान आहे. त्यांनी अनेक पक्ष सोडले असतील मात्र संयम कधीच सोडला नाही. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाकयुद्ध आणि चढाओढीच्या राजकारणाची परिणीती म्हणजे यात अंतिम विजयी गणेश नाईक होतील अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.