जंजिरा व पद्मदुर्ग किल्ल्यात जाण्यासाठी नवीन जेट्टी बांधण्यात आली आहे. या नूतन जेट्टीवर दोन हजार पर्यटक उभे राहण्याची सोय असल्याने पर्यटकांसाठी हा प्रवास सुखकर आहे. परंतु जेट्टी पूर्ण होऊन 10 महिने झाले मात्र पर्यटकांसाठी खुली होत नसल्याने पर्यटक व बोट धारक नाराज आहेत. मुरुड येथील सुप्रसिद्ध जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक हजेरी लावतात.